|| श्री कृष्ण महाराज धनी अवधुत ||
 || Chaturpata Atharvan Ved ||
|| कृष्ण अवधुत देवस्थान, जळगाव-देवगाव ||

बुकमार्क बटनं

 ☰ Menu
Translate(भाषांतर) :  English(इंग्लीश) Hindi(हिंदी) Marathi(मराठी)  
 ✕  Close    


 ✕  Close    

|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
जळगाव-देवगाव

                 सत् यवगाचे आध्यात्मीक ग्यान              
|| चतुर्पती कृष्ण अवधुत देवस्थान ||
            जळगाव-देवगाव , तालुका : आर्वि , जिल्हा : वर्धा,
            राज्य : महाराष्ट ( विदर्भ विभाग ), भारत
Jalgaon Devthan Image

चतुर्पती कृष्ण अवधुत पंथाचे जळगाव-देवगाव येथे १८ व्या शतकातील पुर्ण अवतार कृष्णाजी चे देवस्थान/ राउळ आहे. जळगाव-देवगाव देवस्थान हे हेंगडुजी अवतार व्दारे प्रसारीत चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे एक शाखा आहे. या शाखेला हेंगडुजीचा जळगाव-देवगाव दांड असे म्हणतात. हे देवस्थान चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे जळगाव-देवगाव शाखा चे मुख्य देवस्थान असुन, हे चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या भजनी योगी, संत, भक्ती ईत्यादी यांना प्रेरणा, स्फुर्ति व सत् शक्ती देणारे जळगाव शाखा चे मुख्यस्थल आहे.
१८ व्या शतका पासुन हे देवस्थान/राउळ पुर्ण अवतार कृष्ण मुखातुन निघालेल्या पौरणिक चतुर्पती अथर्वन् वेद चे चतुर्पती ग्यानसंप्पन्न ओवी व भजन गायन, चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ व्दारे महाराष्टतिल विदर्भ विभागाच्या खेडयापाडयासह शहरात प्रेरीत करत आहे. आणी या पंथाच्या कार्याला प्रेरणा, स्फुर्ति व शक्ती ईत्यादी पुर्ण अवतार श्री कृष्णाजी सत् भक्तांच्या घरी जावुन देत आहे. अशी धारणा आहे.

ईथे पुर्ण अवतार श्री कृष्णाजीची मुख्य बाहोली असुन, या बाहुलीवर तो कृष्णा गुप्तरूपाने उभा असुन, तो गुप्तरूपाने हेंगडुजी च्या कार्यास साहयं करत आहे. तो कृष्णा येणा-या सत् यवगाची स्थापना अगोदरचे कार्य प्रपंच सांभाळ करण्यासाठी, चतुर्पती कृष्ण अवधुत भक्तांना स्फुर्ति, प्रेरणा व शक्ती देत आहे. गुप्तरूपाने आपल्या सत् भक्तांच्या घरी जावुन, त्या त्या सत् भक्तांकडुन सत् कार्य करवुन घेत आहेत. नित साहयं होत आहे. अशी या जळगाव-देवगावशाखा ची धारणा आहे.

चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ च्या या जळगाव-देवगाव शाखा चे भक्त भजनी व योगी यांचा पक्का विश्वास आहे की : कृष्ण हा सुर्यवंशीय सुर्य शक्तीचा स्वामी असुन श्री कृष्ण अवतार आहे तर हेंगडुजी हा चंद्रवंशीय चंद्र शक्तीचा स्वामी असुन गोस्वामी अवतार आहे. दोन च्या जोडीने कृष्णाजी-हेंगडुजी दोघेही एकाच वेळी चिरोडीच्या जंगलातील को-या भुम्मेवर प्रकट झालेत. चंद्रबळाचा गोस्वामी अवतार हेंगडुजी हा पुर्विपासुन कृष्णाजीचा परंम् भक्त व परम्ं सखा होता आणी आहे.
सुर्यबळाचा स्वामी कृष्णाजी ने ज्या को-या भुम्मेवर ते प्रकट झालेत तेथुन आपले सत् यवगाचे चतुर्पती कार्य आरंभ केले, तर चंद्रबळाचा स्वामी गोस्वामी अवतार हेंगडुजी हे जळगाव आर्वि वर्धा विभागात जावुन पुनःश्च प्रकट होवुन, तेथुन आपल्या परंम् सखा व स्वामी कृष्णाजीच्या सत् यवगाच्या चतुर्पती ज्ञान प्रचार प्रसार ईत्यादी कार्य प्रेरित व प्रसारीत करू लागलेत.

हेंगडुजी हे कृष्णाजी ला चतुर्पती अधात्म ज्ञान विचारत असे. आणी कृष्णाजी त्यांना सत् यवगाचे चतुर्पती निरंजन ग्यान ची सांगी करत असे. हेंगडुजी हे चंद्रबळाचा गोस्वामी अवतार असल्यामुळे, कविता रंचन करण्याची मुळ सिध्दगुण त्यांच्यात पुर्विस्ताच्या संचिताने आले होते. त्याचमुळे हेंगडुजी हे कृष्णाजीच्या प्रतेक वाक्यांच्या सांगीचे ओवी व भजने मध्ये रूपांतर करू लागलेत. कृष्णा मुखातुन निघालेल्या चतुर्पता अथर्वन् वेद च्या ज्ञान-भक्तीचे सांगीवर आधारीत बहुतांश मुळ ओव्यांची रंचना त्यांनी पुनाजी, देवमनजी यांना संग घेवुन त्यांच्याशी विचार विनिमय करून, कृष्णाजीच्या परवानगीने केल्या आहेत.

श्री कृष्णाजी, हेंगडुजी, पुनाजी, देवमनजी ईत्यादी संतपुरूष हे आपआपल्या जागेवरून टेलीपॅथीच्या विचार लहरी व्दारे एकमेकांशी विचार विनिमय करत एकमेकांच्या संपर्कात होते. याच पध्दतीव्दारे त्यांनी चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ चे नेम व उद्देश, नियोजन व नियम, मार्गदर्शक तत्वे ईत्यादी कृष्णाजीच्या परवानगीने हेंगडुजी, पुनाजी आणी देवमनजी ईत्यादी संत यांनी ठरवलेत. आणी पुनाजीच्या पुढाकाराने मिर्तलोकी चतुर्पता कृष्ण अवधुत पंथ स्थापन केला. आणी त्यांच्या प्रसार व प्रचार विदर्भातील खेडयापाडयात शहरात करू लागलेत.
हेंगडुजी हे कृष्णाजीचे परंम् भक्त व परंम् सखा बनुन, सखाभावाने कृष्णाजीची परंम् भक्ती करू लागलेत. आणी पुर्ण अवतार च्या चर्तुव्युह रूपांच्या रंचनेतील एक अवतार झालेत. पुनाजीच्या पुढाकार व्दारे मिर्तलोकी स्थापित चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे कृष्णाजी सह पुनाजी, देवमनजी यांचा सत् यवग आणण्याच्या कार्यास हेंगडुजीजी नित साहय होवु लागलेत. हेंगडुजीजी चतुर्पती कृष्ण अवधुत पंथ चे भक्त, भजनी व योगी यांना नित स्फुर्ति व साहय करू लागलेत. अधीक ग्यानाकरीता चतुर्पती अथर्वन् वेद चा कृष्णांमृत भाग वाचा.

 || व्हीडीओ : कृष्ण अवधुती ओवी व भजने आणी राउळांचे व्हिडीयो ||

कृष्ण अवधुती ओवी व भजने
कृष्ण अवधुती भजन मंडळे व राउळे यांचे व्हिडीयो

 || आम्हा शोधा ! ||

आम्हा शोधा !
दिशानिर्देश : इथुन.. इथपर्यत..

advertise 

have a nice time !
Current page is % completed.
..